मुझफ्फरपूर-‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटातून राजकीय क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींची बदनामी केली जात असल्याचा आरोप करत अभिनेता अनुपम खेर यांच्यासह चित्रपटाशी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आज बिहारमधील न्यायालयाने अभिनेते अनुपम खेर यांच्यासह अन्य १३ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
वकील सुधीर कुमार ओझा यांनी मुझफ्फरपूर मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. आज मंगळवारी मुझफ्फरपूर कोर्टात न्यायाधीशांनी अनुपम खेर यांच्यासह अन्य १३ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजकीय कारकिर्दीवर आधारित असणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून वादाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने चित्रपटावर आक्षेप घेतला असून यामधून गांधी कुटुंबाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे.