‘द अक्सिडेंटल प्राईममिनीस्टर’चे पोस्टर लाँच

0

मुंबई – ‘द अक्सिडेंटल प्राईममिनीस्टर’ या आगामी चित्रपटात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भूमिका साकारणारे अर्जुन माथूर आणि आहना कुमारा यांचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे. या चित्रपटात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका ज्येष्ठ अभिनेते अनुमप खेर साकारणार आहेत.

अनुपम खैर यांनी ट्विटरवरून या चित्रपटाच्या सेटवरचे एक छायाचित्र चाहत्यांसाठी शेयर केले आहे. ज्यामध्ये अनुपम खैर हे मनमोहन सिंह यांच्या भूमिकेत तर अर्जून माथूर व आहना कुमारा हे राहुल गांधी व त्यांची बहीण प्रियांका गांधी यांच्या भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट डॉ. सिंग यांचा माध्यम सल्लागार संजय बारू यांनी २०१४ मध्ये लिहिलेल्या याच्या नावाच्या संस्मरणावर आधारित आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी च्या काळात डॉ. सिंग २००४  पासून ते २०१४  पर्यंत पंतप्रधान होते. अर्थतज्ज्ञ ते राजकारणी या जीवन प्रवासावर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे.

यामध्ये अक्षय खन्ना हा संजय बारूंच्या भूमिकेद्वारे बऱयाच दिवसानंतर चित्रपटात दिसणार आहे. तसेच सुझान बर्नेट यांचाही यात समावेश आहे. विजय गुट्टा यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि हंसल मेहता यांनी लिहिलेला हा चित्रपट 21 डिसेंबर 2018 रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.