माझ्यावर ठेकेदार असल्याचा आरोप बिनबुडाचा – आ . संजय सावकारे
बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेचा वरणगांव येथे मेळावा संपन्न
वरणगांव । प्रतिनिधी
माझ्यावर ठेकेदार असल्याचा आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे . मात्र, माझ्या परिवारातील एकही सदस्य ठेकेदार असल्याचा पुरावा द्यावा असे प्रति आवाहन आ . संजय सावकारे यांनी केले . बोदवड कृषी बाजार समिती निवडणूकीच्या निमीत्ताने वरणगांव येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते .
भाजप – शिवसेना युतीच्या माध्यमातून बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी परीवर्तन पॅनलच्या निवडणूकीचा प्रचार मेळावा वरणगांव येथील श्री . क्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर येथे रविवारी संपन्न झाला . मेळाव्याला आ . चंद्रकांत पाटील, भाजपाचे अशोक कांडेलकर, चंद्रकांत बढे, पं.स. माजी सभापती राजेंद्र चौधरी, माजी नगराध्यक्ष सुनिल काळे व उमेदवारांची उपस्थिती होती . यावेळी आ. संजय सावकारे यांनी बाजार समिती मधील हुकुमशाही मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी भाजप – शिवसेनेच्या वतीने शेतकरी पॅनल रिंगणात उतरले आहे . मात्र,माझ्यावर जनतेची दिशाभूल करण्यासाठी ठेकेदारीचा आरोप करण्यात आला असून हा आरोप खोटा असुन माझ्या परिवारातील एकही सदस्य ठेकेदार असल्याचा पुरावा द्यावा असे प्रती आवाहन त्यांनी विरोधकांना केले . तर आ . चंद्रकांत पाटील यांनी बाजार समितीची हि निवडणूक भाजप – शिवसेनेसाठी फारशी कठीण नसून शेतकरी बाजार समिती मधील कारभाराला कंटाळले असल्याने युतीच्या उमेदवारांचा विजय निश्चीत असल्याचे सांगितले . यावेळी माजी जि .प . अध्यक्ष अशोक कांडेलकर, चंद्रकांत बढे, पं. स . माजी सभापती राजेंद्र चौधरी व सुनिल काळे यांनीही मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन केले .
मेळाव्याला यांचीही होती उपस्थिती
मेळाव्याला माजी उपनगराध्यक्ष शेख अखलाख शेख युसुफ, अतुल झांबरे , सुनिल माळी ,प्रशांत पाटील , विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, सरपंच, उपसरपंच , ग्रा पं सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती .