लखनऊ – उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील एका तरुणीने भाजपा नेत्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. पीडितीने गाजीपूर पोलिस स्टेशनमध्ये याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत पीडितेने भाजपा नेता आणि उच्च न्यायलयाचे अधिवक्ते सतिश शर्मा यांच्यावर मागील तीन वर्षांपासून बलात्कार करत असल्याचा आरोप केला आहे.
लखनऊतील प्रेस क्लबमध्ये येथे पीडित तरुणीने आज पत्रकार परिषदेत घेत हा खुलासा केला आहे. यावेळी पीडित तरुणीने आपल्या कुटुंबियांना धमकावत असल्याचाही आरोप सतिश शर्मा यांच्यावर केला आहे. मला किंवा माझ्या कुटुंबियांना त्रास दिल्यास पीडित तरुणीने आत्महत्या करण्याचा इशारा यावेळी दिला.
आम आदमी पार्टीच्या नेत्या खासदार अलका लांबा यांनी याबाबत ट्वीट केले आहे.
पीडित तरुणीने न्याय न मिळाल्यामुळं या पत्रकार परिषदेत स्वता:चे केस कापत भाजपा नेत्याचा निषेद केला. तक्रार दाखल करुनही पोलिसांनी शर्मा यांच्यावर कारवाई केली नसल्याचा आरोपही पीडित तरुणीने केला आहे.
उत्तर प्रदेश योगी राज में एक और BJP नेता पर यौन शोषण का आरोप,
प्रेस कांफ्रेंस में पीड़ित ने अपने बाल काटे,
BJP नेता सतीश शर्मा पर यौन शोषण का आरोप।
ABP newsBJP नेता से अपनी अपनी #बेटी_बचाओ
— Alka Lamba (@LambaAlka) May 7, 2018