अमेरिकन फर्स्ट पर्सनही कोरोनाच्या विळख्यात !

0

वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. जगातील सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत आहे. दरम्यान आता अमेरिकेचे प्रथम पुरुष आणि प्रथम महिला अर्थात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सहकारी पॉझिटिव्ह आल्याने डोनाल्ड ट्रम्प क्वारंटीनमध्ये होते. त्यांचा चाचणी अहवाल प्रतिक्षेत होता. अहवाल प्राप्त झाल असून ते ट्रम्प पती-पत्नी पॉझिटिव्ह आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे.

https://twitter.com/realDonaldTrump/status/1311892190680014849

दोन दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी निवडणूक डिबेट दरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवार ज्यो बायडन यांच्यावर टीका करताना गरज भासली तरच मास्क घालेन, असे सांगितले होते. तसेच अनेकदा त्यांनी जाहीररित्या मास्क घालणार नाही असे म्हटले होते.

डिबेटवेळी ट्रम्प म्हणाले की, जर आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन असते तर अमेरिकेत आज 20 लाख लोक मृत झाले असते. यावर बायडन यांनी ट्रम्प यांच्यावर पलटवार केला. ट्रम्प यांच्याकडे आताही कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी कोणताही प्लॅन नाही, त्यांनी केवळ वाट पाहिली आहे. त्यांच्याकडे पुरेसा पैसा नाही, ज्याचा उपयोग करून लोकांचे प्राण वाचविले जाऊ शकतील. यावेळी ट्रम्प यांनी भारताला चीन आणि रशियाच्या पंक्तीत बसवत त्या देशांप्रमाणे भारतानेही कोरोना मृतांचा आकडा लपविल्याचा आरोप केला आहे.