डॉ मणीभाई जयंतीनिमित्त पुरस्कार म्हणजे विभुतीपुजा… जेष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे 

पुणे: भारताच्या ग्रामविकासाचे अग्रणी असणारे डॉ मणीभाई देसाई ह्यांनी जीवनभर समर्पित भावनेने ग्राम सुधारण्याचे व जन कल्याणाचे कार्य तहयात केले.मणीभाई जिंच्या कार्याचे मूल्यमापन करणे म्हणजे एक प्रकल्प होईल.म गांधीजींना वचन देउन त्यांनी जीवनभर विविध क्षेत्रांत राष्ट्रसेवा करून निष्काम कर्मयोग साधला.पुरस्कार प्रेरणा देतात व प्रेरणेमुळे राष्ट्रात नवनिर्मिती होते.पद्मश्री डॉ मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार व जयंती कार्यक्रम म्हणजे विभूती पूजा आहे असे मत ज्येष्ठ समाजसेवक डॉ रविंद्र भोळे ह्यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.शांतीसेनेचे पुरस्कर्ते व सामाजिक न्यायाचे ऊर्जास्रोत पद्मश्री डॉ मणीभाई देसाई प्रतिष्ठान निती आयोग संलग्नित आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींजी आरंभीत भारत सरकार वतिने मॅगसेसे पुरस्कार विजेते पद्मश्री डॉ मणीभाई जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ह्या वेळी पद्मश्री डॉ मणीभाई राष्ट्र सेवा पुरस्कार, समर्पित भावनेने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मेळावा व मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तसेच स्व खासदार गिरीषजी बापट ह्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली . मनोगत व्यक्त करताना ज्ञानदेव खाचणे अध्यक्ष भ्रातृमंडळ बुलडाणा म्हणाले की मणीभाई राष्ट्रसेवा पुरस्कार प्रेरणा दाई असुन कार्यकर्त्यांना स्फुर्ती मिळते . जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रविंद्र भोळे ह्यांचे समाजकार्य वाखाणण्यासारखे आहे.ह्या कार्यक्रमाला प्रसाद नंदलाल चौधरी जिएस्टी टॅक्स असी .कमिशनर,संजय देशमुख अध्यक्ष अ भा लोकस्वतंत्र पत्रकार महासंघ, अनुव्रतश्री डॉ ललिता जोगड , निनाभाऊ खर्चे अध्यक्ष पी ची लेवा पाटीदार संघ, श्री डी के देशमुख सचिव भ्रातृमंडळ बुलडाणा, यतीन ढाके मुख्य संपादक दै जनशक्ती, श्याम पाटील संपादक लेवा जगत, सामाजिक कार्यकर्ते दिलीप नाफडे, अमोल पाटील अध्यक्ष मुक्ताई प्रतिष्ठान,सुधीर चंद्र उत्तम जनरल मॅनेजर ऑपरेशन विस्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर

व अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.ह्या वेळी राज्य राष्ट्रीय पातळीवर पद्मश्री डॉ मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार डॉ आदिती कराड, यतीन ढाके, प्रसाद चौधरी, श्याम पाटील, राजीव जाधव, सुनिल इंगळे,अमोल पाटील, नितिन बोंडे, ज्ञानदेव खाचणे, डॉ अंकुश पवार, सरोज सरोदे, हभप काजल ताई काळे, डॉ हरिभाऊ भापकर विनायक बेंबडे, राजेखान एस पटेल, डॉ उज्वला लाठी, रीता राजपूत, हभप नीलेश कोंडे देशमुख, ललित जाधव, धनश्री जाधव, राजेंद्र पाटील, भाऊसाहेब महाडीक, व्यंकटेश महाडीक आजी नाथ ओगले प्रदीप खाडे, राजेंद्र देशमुख, अड राजेश जाधव, अंबादास तल्हार, मोहन शेळके, रामराव देशमुख,पंजाबराव देशमुख, स्वप्नील देशमुख, अड स्मिता चिपळूणकर, अड पियाली घोष, अमित कदम, पंकज राऊत, यांच्यासह नव्वद कार्यकर्त्यांना पद्मश्री डॉ मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले.पुरस्कार सोहळ्याचे हे तीसावे वर्ष आहे.ह्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन एल डी साळवे ह्यांनी केलें.आभार प्रदर्शन गणेश चव्हाण यांनी केले.अंकुश दळवी, प्रफुल झोपेसुनिल इंगळे ह्यांनी सहकार्य केले.,शेवटी पसायदान होउन कार्यक्रमाची सांगता झाली.हा समारंभ कार्यक्रम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक कला रंगमंदिर गुंजन टॉकीज जवळ येरवडा पुणे येथे संपन्न झाला.