शिवराज्यभिषेक सोहळ्यास सुरुवात

0

रायगड: आज रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळा सुरु झाला असून, खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. अखिल भारतीय शिवराज्यभिषेक महोस्तव समिती यांच्या वतीने हा सोहळा पार पाडला जातो. गडावर शिवप्रेमींची मोठी गर्दी दिसून आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते गडपूजन झाल्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली. या वेळी शिवकालीन युद्धकलेचा कार्यक्रम पार पडला. या युद्धकलेच्या कार्यक्रमात तलवार, भाला, जांबिया, माडु, फरी- गदगा यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

कार्यक्रमाच्या अगोदर शिवभक्तांनी रायगडावर स्वच्छता मोहीमही राबवली. रायगडावर बुधवारी झालेल्या कार्यक्रमांना संभाजीराजे समवेत पोलंड व चीन येथील प्रतिनीधी उपस्थित होते.तसेच विविध राज्यातील शिवप्रेमी राज्यभिषेक सोहळ्यास उपस्थित आहेत.