भरारी फाउंडेशन शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील ३८८ विद्यार्थ्नाना शैक्षणिक साहित्य वाटणार

0

जळगाव: ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे’ या उक्तीप्रमाणे शहरातील भरारी फाउंडेशनने सामाजिक दातृत्व म्हणून शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबाना मोलाची साथ देत आहे. भरारी फाउंडेशन तर्फे शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबाना सर्वतोपरी साहाय्य करत असून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करत आहे. गेल्यावर्षी भरारी फाउंडेशनने इयत्ता १ ली ते १० वी मध्ये शिकणाऱ्या ३८८ विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. या दत्तक विद्यार्थ्यांना शालेय फी सह सर्व शैक्षणिक साहित्याचे वाटप
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे.

मुलींचे लग्न, शैक्षणिक जबाबदारी घेत कार्य
भरारी फाउंडेशन तर्फे गेल्या चार वर्षात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या मुलींचे लग्न लावून देण्यात आली आहेत. यात २२ मुलीच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारून आतापर्यंत समाजातील अनेक दातृत्वातून ६ मुलींचे लग्न झाली आहेत. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलींचे लग्न पैशा अभावी होत नाही, अशा मुलींच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारून लग्न लावून देण्यात आलि आहे. तसेच १ ली ते १० वी मध्ये शिकणाऱ्या ३८८ विद्यार्थ्यांची जबाबदारी फाउंडेशन ने स्वीकारली आहे. त्यांना शिक्षणात सर्वतोपरी मदत केली जात आहे. गेल्या वर्षी भरारी फाउंडेशनने १५४ मुल दत्तक घेतली होती. आता यावर्षी ९८ मुल दत्तक घेतली जाणार हा दत्तक विधीचा कार्यक्रम जुलै दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. यात त्यांच्या शिक्षणाचा सगळा खर्च फाउंडेशन करणार आहे.

विधवा पत्नींना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य
जिल्ह्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी यांना स्वत:च्या पायावर उभे राहून सक्षम बनवण्यासाठी भरारी फाउंडेशन कडून जिल्ह्यातील ५० महिलांना त्यांच्याच गावात, भागात व्यवसाय व शेती करण्यासाठी मदत केली गेली आहे. दोन महिलांना व्यवसायासाठी ३५ हजार रुपये किमतीच्या पिठाची गीरणी घेवून देण्यात आली आहे. पिठाची गिरणी, सुवर्णा किरण पाटील, कचरे ता. अमळनेर, सविता दौलत खैरनार, आर्वी, ता. अमळनेर या महिलांना घेवून दिली आहे. तसेच काही महिलांना पिकोफॉल चे मशीन घेवून देण्यात आले आहे. दोन महिलांना शेतातील साधन सामग्री, बी बियाणे, तर एका महिलेला ३० हजार रुपायांची मदत केली गेलिया आहे. ५० पैकी १२ महिलांना आतापर्यंत त्यांच्या पायावर उभे करण्यात आले असून उर्वरित ३८ महिलांना सक्षम बनविण्याचे प्रयत्न चालू आहेत.

शहरातील दातृत्वद्वार लोकांचे अनमोल सहकार्य
या महान कार्यासाठी शहरातील दातृत्वद्वार लोकांचे अनमोल सहकार्य मिळत आहे. त्यात के.के कँन्स चे रजनीकांत कोठारी, रोटरी क्लब चे कल्पेश शहा, नवजीवन सुपर शॉपीचे अनिल कांकरिया, महावीर क्लासचे नंदलाल गादिया, अशोक जैन, भालचंद्र पाटील यांचे सहकार्य मिळत आहे.