मुक्ताईनगर प्रतिनिधी…..
मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे आज दि. २५ जून २०२३ रोजी नावाडी संघटना मासेमारी बांधव शेतकरी बांधव व मजूर बांधव यांच्या कडून सूर्य पुत्री तापी नदी माता जन्म उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्विय सहायक प्रविण चौधरी यांच्या हस्ते तसेच चांगदेव येथील सरपंच निखिल बोदडे माजी सरपंच पंकज कोळी तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक तापी नदीला 108 मिटर अखंड साडी व चोळी अर्पण करून विधिवत पूजा करण्यात आली या प्रसंगी सर्व नावाडी संघटनेचे पदाधिकारी शेतकरी व गावकरी मंडळी सह परीवार उपस्थित होते. संगम स्थळी जाऊन साडी अर्पण करून व पूजन करून महा आरती करण्यात आली या वेळी सर्व भाविकांसाठी व परिसरातील नागरिकांसाठी नावाडी संघटने तर्फे महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तापी पूर्णा संगम नावाडी संघटना व अध्यक्ष राजेंद्र भोई व सचिव संजय भोई यांनी परिश्रम घेतले.