नवी दिल्ली : राजीनाम्यानंतर राष्ट्रगीत सुरू असताना येडियुरप्पा आणि भाजप नेते विधानसभेतून बाहेर जात असल्याचे तुम्ही पाहिले असाल, याचविरुद्ध आम्ही भांडत आहो असे म्हणत राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. कर्नाटकच्या प्रकरणावरून भाजपला आणि आरएसएसला धडा मिळाला आहे असे आरोप कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले. मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप सरकार कोसळले आहे. त्यांतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजपचा पर्दाफाश
भाजपने कर्नाटक, गोवा आणि मणिपूरमध्ये जनादेशाचा अपमान केला. पण, आज पंतप्रधान हे जनता, सुप्रीम कोर्ट आणि लोकशाहीपेक्षा मोठे नाहीत हे दिसून आले. भ्रष्टाचाराविरुद्ध लढत असल्याचा दावा करणाऱ्या मोदींचा या निमित्ताने पर्दाफाश झाला आहे. खुलेआम भाजपच्या नेत्यांनी काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला. देशाच्या न्यायव्यवस्थेशी छेडछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप आणि आरएसएसला आम्ही लढा देणार आणि त्यांना रोखणार, असंही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.