यावल चोपडा रस्त्यावर त्या विहीरीतील मृतदेह हे यावलच्या बेपत्ता झालेल्या तरूणाचे असल्याची ओळख पटली

यावल ( प्रतिनिधी ) येथील शहरालगत असलेल्या विरावली शिवारात विहीरीत एका तरूणांचा मृतदेह मिळुन आल्याची घटनासमोर आली होती अखेर त्या मरण पावलेल्या तरूणाची ओळख पटली असुन तो यावलचा राहणारा असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात मिळालेली अशी की यावल शहरा पासुन सुमारे दोन किलोमिटर लांब चोपडा मार्गा वरील दरबारसिंग शांताराम पाटील वय७१ वर्ष यांच्या विरावली शिवारातील शेत गट क्रमांक१७५ च्या शेतातील सुमारे १३० फुट खोल असलेल्या विहीरीतीत पडून पाण्यात बुडून मरण पावलेल्या तरूणाचे गणेश सपकाळे वय ३०वर्ष वय अशी त्याची ओळख पटली आहे . या बाबतची माहिती अशी आज दिनांक५ऑगस्ट रोजी शेतात कामास गेलेल्या महीलांना विहीरीतुन दुर्गंधीचा वास आल्याने त्यांनी शेतमालकास सदरची माहिती दिल्याने शेतमालक दरबारसिंग यांनी सदरची माहीती दिली वरून पोलिसांनी त्या विहीरीतुन नागरीकांच्या मदतीने मृतदेह विहीरीतुन काढल्यावर सदरच्या तरूणाची ओळख पटली असुन तरुणाचे नांव गणेश उर्फ सोनु प्रकाश सपकाळे वय३oवर्ष राहणार विठ्ठलवाडी यावल असे असुन तो मागील तिन दिवसापासुन बेपत्ता झाला होता याबाबत त्याच्या कुटुंबीयांनी हरविल्याची खबर पोलिसात दिली होती , पोलीस मरण पावलेल्या अज्ञात तरुणाचे प्रेत काढण्यात आले असुन , प्रेताचे जागेवरच पंचनामा व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी केले या संदर्भात शेतमालक दरबारसिंग शांताराम पाटील यांनी खबर दिल्याने यावल पोलीस ठाण्यात आक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे व पोलीस करीत आहे घटनास्थळी.