बेपत्ता झालेल्या जवानाचा मृतदेह सापडला चक्क विहीरीत !

१३ मे पासून बेपत्ता होता जवान, मित्राला सोडण्यासाठी आले होते मलकापूरला 

मुक्ताईनगर । प्रतिनिधी

भारतीय सेनेत नोकरीला असलेला २५ वर्षीय जवान चिखली ता . मुक्ताईनगर येथून दि .१३ मे रोजी रात्री ११ वाजेपासून बेपत्ता झाला होता . मात्र, दि .१५ मे रोजी सांयकाळी या जवानाचा मृतदेह चिखली शिवारातीलच एका विहीरीत आढळून आला . याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती .

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संदिप शिवाजी शेळके ( वय -२५ ) रा शिरपूर ता. जि . बुलढाणा हा भारतीय सेनेत कार्यरत होता .