वॉशिंग्टन – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी ४.९ अब्ज डॉलर्स इतका काळा पैसा पांढरा करण्यासाठी भारतात पाठवल्याचा आरोप करण्यात आला होता. माध्यमांनी शरीफ यांच्यावर केलेले हे आरोप चुकीचे असल्याचे जागतिक बँकेने सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी माध्यमांनी नवाज शरीफ यांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी भारतात पाठवला असल्याचा अहवाल सादर केला होता. हा अहवाल चुकीचा असल्याचा जागतिक बँकेने सांगितले आहे.
यासंदर्भात नॅबने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शरीफ यांनी केलेल्या या व्यवहाराची नोंद जागतिक बँकेने २०१६ साली घेतली होती. या अहवालात मनी-लॉन्डरिंग किंवा कोणाचेही व्यक्तीगत नाव नसल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. दरम्यान, भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी शरीफ यांना पंतप्रधानपदावर राहण्यास अपात्र ठरविले. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून त्यांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागलेले आहे. भ्रष्टाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविल्यास शरीफ यांना कारावासाची शिक्षाही होऊ शकते.