शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या लहान मोठे नेते मंडळी यांचे हिंदवी स्वराज्य संस्थापक स्वराज्य रक्षकाच्या पुण्यतिथी कडे दुर्लक्ष

शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या लहान मोठे नेते मंडळी यांचे हिंदवी स्वराजचे संस्थापक, स्वराज्यरक्षकांच्या पुण्यतिथीकडे दुर्लक्ष झाले. शिवरायांना अभिवादन करायला, या राष्ट्रपुरुषांच्या स्मृतीस श्रद्धा-सुमने अर्पण करायला लहान मोठे नेते मंडळी अँड कंपनीला वेळ नाही. कारण ही मंडळी छत्रपती शिवरायांची बदनामी करणाऱ्या सावरकरांच्या गौरव यात्रेत मश्गुल झालेली आहेत.

हिंदू हृदय सम्राट, महान पराक्रमी असा रयतेचा राजा, हिंदवी स्वराजचे संस्थापक, राष्ट्र नायक, थोर मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 343 वी पुण्यतिथी आहे. 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं दीर्घ आजाराने निधन झाले होते. अशा या स्वराज्य रक्षक, महापराक्रमी राजाला श्रद्धांजलि अर्पण करण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याला वेळ नसावा, हे केव्हढे या राष्ट्राचे दुर्दैव! त्याऐवजी ही मंडळी करतआहेत काय? तर – छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची लिखाणातून बदनामी करणाऱ्या विनायक दामोदर सावरकर यांच्या गौरवासाठी यात्रेत मश्गुल आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर निवडणूक लढणाऱ्या, महाराजांच्या नावे मते मागून सत्तेत आलेल्या या मंडळींना आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापेक्षा त्यांची बदनामी करणारे विनायक सावरकर हे जास्त प्राधान्याचे वाटू लागले आहेत. महाराजांची पुण्यतिथी दुर्लक्षून त्यांची बदनामी करणाऱ्या सावरकरांच्या गौरवात रममाण असलेल्या शिंदे-फडणवीस अँड कंपनीच्या कृतीचा अर्थ तरी महाराष्ट्राने काय घ्यावा.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकृतरित्या जारी केला गेलेला शिंदे-फडणवीस यांचा आजचा सरकारी कार्यक्रम (दौरा) खाली जसाच्या तसा दिलेला आहे. त्यात उपमुख्यमंत्री फडणवीस हे संध्याकाळी सावरकर गौरव यात्रा कार्यक्रमात सामील होणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे दिवसभर सह्याद्री अतिथीगृह येथे सरकारी बैठकात व्यस्त आहेत. शिवरायांना श्रद्धांजली वाहण्याचा कोणताही सरकारी अधिकृत कार्यक्रम यात दिसत नाही.