मुंबई : कोरोना व्हायरसचा डोळ्यांवरही गंभीर परिणाम होत असल्याची माहिती एका रिसर्चच्या माध्यमातून समोर आली आहे. अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांमध्ये डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागात संक्रमण होण्याची शक्यता देखील असू शकते. डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागात वेदना होणे किंवा डोळ्यांची जळजळ, डोळ्यांना सूज येणे, ज्यामुळे डोळ्याच्या बाहुल्याच्या पांढर्या भागावर परिणाम होतो.
बीएमजे ऑप्थल्मोलॉजीमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार डोळ्यामधील लक्षणांकडे लोक फारसे लक्ष देत नाहीत. अभ्यासानुसार, संशोधनात सामील झालेल्या सुमारे 18 टक्के रुग्णांना प्रकाशाची संवेदनशीलता जाणवली, ज्यास फोटोफोबिया देखील म्हणतात. जेव्हा वातावरणात प्रकाश खूप जास्त असतो तेव्हा हे लक्षण उद्भवू शकते. यामुळे रुग्णांना समस्या उद्भवू शकतात, परिणामी डोळ्यांची दृष्टी कमी होऊ शकते किंवा एखाद्या व्यक्तीच्या दृष्टीत बिघाड होऊ शकतो. खाज सुटणे, घसा कोरडा पडणे देखील कोरोनाचे सामान्य लक्षण असू शकते. या अभ्यासात असे दिसून आले आहे की जवळपास 17 टक्के कोरोना रूग्णांनी खाज सुटलेल्या डोळ्यांबाबत तक्रार केली आहे, तर 16 टक्के लोकांना डोळ्यांच्या समस्या उद्भवल्या. खाज सुटणे आणि वेदना देखील डोळ्यांच्या लालसरपणाशी संबंधित असू शकते जे डोळ्यांच्या संक्रमण आणि एलर्जीमुळे उद्भवू शकते. जास्त डोळे चोळल्यानं ही समस्या आणखी वाढू शकते. काही लोकांना डोळ्यांची जळजळ होणे, लालसरपणा, डोळ्याभोवती मुरुमं आणि वाहणारे नाक किंवा शिंका येणे यासारख्या एलर्जीची लक्षणं देखील दिसू शकतात.