गाईच्या दुधात दोन रुपयांची वाढ

0

पुणे: गाईच्या दुधाचा भाव दोन रुपयांनी वाढवण्याचा निर्णय खाजगी सहकारी दुध उत्पादकांनी आज झालेल्या बैठकीत घेतला आहे. नवीन दर ८ जूनपासून लागू होणार आहे. गेल्या काही दिवस अगोदर अमूलने आपल्या दुधाच्या दरात वाढ केली होती. त्या पाठोपाठ मदर डेरीने ही वाढ केली होती. त्या अगोदर पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ गोकुळने गाईच्या दुध खरेदीत दोन रुपायांची वाढ केली आहे.

सरकीचे वाढलेले दर, राज्यात पाणी, चाऱ्याची टंचाई या पार्श्वभूमीवर दुध खरेदीवर 2 रुपये वाढ याचा फारसा फायदा शेतकऱ्यांना, तसेच पशुपालक यांना परवडणार नसल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.