नवी दिल्ली: सीबीएसईच्या दहावीच्या निकालाची तारिख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. लवकर अधिकृतपणे जाहीर करण्यात येईल, सोशल मीडियात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आव्हान सीबीएसई बोर्डाचे जनसंपर्क अधिकारी रमा शर्मा यांनी रविवारी केले आहे.
सीबीएसई बोर्डाचा 10 वी चा निकाल आज जाहीर होणार आहे अशी अफवा असल्याची घोषणा बोर्डाकडून करण्यात आली आहे. साधारणतः सीबीएसीई बोर्डाचा 12वीचा निकाल लागल्यानंतर दोन ते तीन दिवसांपर्यंत 10वीचा निकाल ही जाहीर करण्यात येत असतो. पण यावेळी मात्र कोणत्याही प्रकारची सूचना सीबीएसीई बोर्डाकडून देण्यात आलेली नाही आहे.
सीबीएसई बोर्डाच्या पीआरओ रमा शर्मा यांनी सांगितले की, “सोशल मिडीयावर निकालासंदर्भात पसरवण्यात येणाऱ्या सर्व बातम्या ह्या खोट्या आहेत. सीबीएसई बोर्डाचा 10वी चा निकाल आज जाहीर होणार नाही आहे.” बोर्डाकडून निकालासंदर्भात योग्य ती माहिती पुरवण्यात येईल असे त्या म्हणाल्या. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. असे सीबीएसीईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र अद्यापही निश्चित तारीख सांगण्यात आलेली नाही.