कोरिया – छत्तीसगडमधील झागराखंड पोलीस स्थानकाच्या हद्दीतील भौता गावात वीज पडल्यामुळे दोन मजुरांचा मृत्यू झाला तर २ मजूर जखमी झाले. हे सर्व मजूर महाराष्ट्रातील गोंदियाचे आहेत. वीज पडल्यानंतर जखमी मजुरांना मनेन्द्रगड सामुदायिक स्वास्थ्य केंद्रात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कामगार विभागात नोंदणी नाही
एप्रिल-मे महिन्यात तेंदुपत्ता गोळा करण्याची कामे मोठ्या प्रमाणावर केली जातात. तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी कंत्राटदार मजूर बाहेरच्या राज्यातून आणतो. भौता गावात तेंदुपत्ता गोळा करताना जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरु झाला त्यामुळे सर्व मजूर झाडाखाली उभे राहिले. मात्र अचानक झाडावर वीज पडून दोन कामगार गंभीरपणे जळाले आणि दोन मजूर मरण पावले. कंत्राटदार विजय बडेराने हे काम करण्यासाठी गोंदियामधून ६१ मजूर आणले होते. या सर्व मजुरांची कामगार विभागात कोणतीही नोंदणी नसून केवळ पोलीस ठाण्यातच त्यांची नोंदणी करण्यात आली आहे. कामगार विभागात या कामगारांची नोंदणी न होणे ही निष्काळजीपणा आहे.