डोळ्याला उंदराने चावा घेतल्याचा दावा केलेल्या रूग्णाचा मृत्यू

0

मुंबई : जोगेश्वरीतील मुंबई महानगरपालिकेच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाच्या डोळ्याला उंदराने चावा घेतल्याचा दावा रूग्णाच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला होता. आता या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोमामध्ये असलेल्या 27 वर्षीय रूग्णाला आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र खर्च हाताबाहेर जात असल्याने त्यांनी रुग्णाला जोगेश्वरीच्या पालिका हॉस्पिटलमध्ये हलवले होते.

जनरल वॉर्डमध्ये काही दिवसांपूर्वी उंदीर पाहिल्याचे रूग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. 27 वर्षीय रूग्ण गेले दोन महिने कोमामध्ये होता. शस्त्रक्रियेच्या मदतीने मेंदूतील क्लॉट्स काढण्यात आले. कोमामध्ये असलेल्या रूग्णावर 8 मार्चला शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.