काश्मीर मध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

0

जम्मू: काश्मीरमध्ये अनंतनाग या ठिकाणी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत २ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. हे दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे आहे.

जम्मू- काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद विरोधात मोहीम राबवत १८ दहशतवाद्याना कंठस्नानी घातले. गेल्या आठवड्यात गुरुवारी पुलवामा येथे झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला होता. तो अल कायद्याशी संबधित अन्सार गझवट उल हिंद या संघटनेचा होता, त्याचे नाव झाकीर मुसा हे होते. झाकीर मुसा हा दहशतवादी सुरक्षा रक्षकांच्या रडारवर होता.