सावदा येथील दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय अखेर स्थगित
सावदा (प्रतिनिधी) – सावदा येथे दि 8 पासून दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता व यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेली बैठक व धरणात असलेला पाणी साठा त्याचे होणारे बाष्पीभवन आदी कारणे सांगण्यात आली होती
मात्र या निर्णया बाबत सावदा शहर वासीय नागरिकांत तीव्र नाराजी होती, मजूर व हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होणार होत्या या बाबत सावदा येथील भारतीय जनता पार्टी तर्फे उपविभागीय अधिकारी तसेच नगरसेवक राजेंद्र चौधरी व फिरोज खान पठाण यांनी सावदा पालिकेत याबाबत निवेदन देऊन यात जनभावना लक्षात घेऊन सदर निर्णय मागे घ्यावा अन्यथा जनआंदोलन उभे करण्याचा इशारा दिला होता या दोन्ही निवेदनाचा विचार करण्याचे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते
दरम्यान दि 8 रोजीच सध्या झालेल्या अवकाळी पावसाने पूर्णा नदीत सोडण्यात आलेल्या पाण्या मुळे हतनूर धरणाच्या पाण्यात थोडी वाढ झाल्याचे कारण सांगत सावदा शहरातील दोन दिवसाआड करण्यात आलेला पाणी पुरवठा पूर्ववत एक दिवसाआड करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली यामुळे सदर निवेदनाचा परीणाम स्वरूप हा निर्णय घेण्यात आल्याचे देखील नागरिकांत म्हटले जात असले तरी काहीही असले तरी नागरिकांना मात्र एक उन्हाळ्यात पाणी टंचाई पासून दिलासा मिळाला आहे हे मात्र खरे