भुसावळ प्रतिनिधी l
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल शहरातील एका परिसरातील परिवारातील काही वादाने पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी मारून तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. हि घटना सोमवारी १९ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघड झाल्याची माहिती मिळत आहे.. एरंडोल शहरातील गांधीपुरा परिसरातील शहरातील गांधीपुरा वखारीजवळील भागात १९ जून सोमवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास पती व पत्नीमध्ये वाद होत हा वाद इतक्या टोकाला गेला कि पतीने थेट पत्नीला मारहाण करीत असतांना डोक्यात फरशी मारून तिचा खून झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत २७ वर्षीय विवाहिता हर्षदा किरण मराठेचा मृत्यू झाला तर संशयित आरोपी पती किरण महादू मराठे (३५) यास एरंडोल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचे माहिती कळताच एरंडोलचे निरीक्षक सतीश गोराडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला तर संशयित पतीला चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.