नवी दिल्ली-राफेल करारात कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करत या कराराची चौकशी व्हायला हवी या मागणीसाठी आज संसदेबाहेर आज विरोधकांनी निदर्शने केली. संसदेबाहेर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली सगळ्याच विरोधकांनी निदर्शने केली. राफेल करार करून सरकारने जनतेची लूट केली आहे असा आरोप विरोधकांनी केला.
राफेल करार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या व्यापारी मित्रासाठी केला. या कराराची किंमत किती आहे ते सरकार उघड का करत नाही असे आरोप यआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहेत. आज पुन्हा एकदा राफेलवरून संसदेबाहेर निदर्शने करण्यात आली.