आदिवासी टोकरेकोळी जमातीच्या न्याय व हक्काचा लढा यशस्वी..

तालुका संपर्क प्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांच्या प्रयत्नांना यश.

चोपडा (प्रतिनिधी )l

दि. ८ मे पासून अमळनेर येथील प्रांत कार्यालय समोर आदिवासी टोकरे कोळीचे जातप्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे यासाठी चोपडा महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्क प्रमुख जगन्नाथ बाविस्कर गोरगावलेकर यांनी समाज बांधवांसह तीव्र अन्नत्याग सत्याग्रह सुरू केलेला होता. संबंधित विभागाचे अधिकारी यांनी पाचव्या दिवशी याबाबत दखल घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी कैलास कडलक यांनी आज अखेर जेवढे प्रलंबित प्रकरणे असतील त्यांना टोकरे कोळी जातीचा दाखला देण्यास सुरुवात केली, यामुळे अमळनेर व चोपडा तालुक्यातील शेकडो समाज बांधवांना टोकरे कोळीचे (एस.टी.) दाखले मिळणार आहेत. यामुळे कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर यांनी केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाचा प्रयत्नांना विशेष यश मिळाले , त्यांचे जिल्हा व राज्य भरातून कौतुक होत आहे. प्रत्येक प्रांत कार्यालयातून असे दाखले मिळून देण्यासाठीही त्यांचे विशेष प्रयत्न राहणार आहेत.

सदर उपोषण पाचव्या दिवशी प्रांताधिकारी कैलास कडलक, अमळनेर यांच्याहस्ते अन्नत्याग सत्याग्रह कर्ते जगन्नाथ बाविस्कर यांना सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले. याप्रसंगी

ॲड. गणेश सोनवणे, माजी पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग, बाळासाहेब सैंदाणे , योगेश बाविस्कर, नामदेव येळवे, गोपाळराव सोनवणे, शुभम सोनवणे, प्रकाश खन्ना, गुलाबराव बाविस्कर, प्रल्हाद कोळी, लखीचंद बाविस्कर, हिलाल सैंदाणे, सुखदेव कोळी, रामचंद्र सपकाळे, कैलास सोनवणे, गोविंदा कोळी, एस कुमार पेंटर, गोपाळ बाविस्कर, विठ्ठल कोळी, गोपीचंद कोळी, प्रशांत सोनवणे, राकेश कोळी, चंद्रकांत कोळी, वसंत कोळी, मनोज कोळी, मनोहर साळुंखे, पंकज बाविस्कर, विजय सैंदाणे, सागर कोळी, भूषण कोळी, डॉक्टर भिकन शिरसाट, गणेश कोळी, वैभवराज बाविस्कर, भाऊसाहेब बाविस्कर, समाधान सोनवणे, रामभाऊ बाविस्कर, डॉक्टर गोकुळ बिराडे, विशालराज बाविस्कर, निर्मला पाटील, आशाबाई बाविस्कर, सावित्रीबाई बाविस्कर, निर्मला बाविस्कर, कस्तुरबाई बाविस्कर, यांचे सह तालुका व जिल्हा व जिल्हा बाहेरील समाज बांधव, पदाधिकारी शेकडो चा संख्येने उपस्थित होते.

अन्नत्याग सत्याग्रह प्रसंगी कोळी महासंघ व कोळी समाज पंच मंडळ अमळनेर यांचे विशेष सहकार्य लाभले.

सदर प्रसंगी पोलीस अधिकारी राकेश जाधव, व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त केला ..

समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी सतत लढत राहील..

जय वाल्मिकी समाजासाठी वाटेल ते करू, जिंकू किंवा मरू यातत्त्वनुसार हा लढा यशस्वी झाला आहे. यापुढेही समाज बांधवांसाठी असाच लढत राहील…

जगन्नाथ बाविस्कर , तालुका संपर्क प्रमुख,

महर्षी वाल्मिकी समाज मंडळ, तालुका चोपडा..

समन्वयक. . कोळी समाज पंच मंडळ अमळनेर..