रांची: ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता,’ असे अभिनेता कमल हासन यांनी केले आहे. कमल हासनने अभिनय क्षेत्राकडून राजकीय क्षेत्राकडे आपला मोर्चा वळविला आहे. ‘मक्कल निधी मियाम’ हा त्यांचा पक्ष आहे. कमल हासन यांच्या या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
चेन्नईतील अरिवाकुरुची विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना कमल हासन यांनी हे वक्तव्य केलं. नथुराम गोडसे हा महात्मा गांधी यांची हत्या करणारा स्वतंत्र भारतातील पहिला अतिरेकी होता आणि तो हिंदू होता. याठिकाणी मुसलमानांची लोकसंख्या अधिक आहे म्हणून मी हे बोलत नाही. तर महात्मा गांधीच्या पुतळ्याखाली उभा असल्याने मी हे बोलत आहे, असे कमल हासन म्हणाले.