भारतात कोरोना चाचणीचा नवा विक्रम; एका दिवसात विक्रमी चाचणी

0

नवी दिल्ली: भारतात कोरोनाने अक्षरश: कहर माजविला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या ५८ लाखांच्या पुढे गेली आहे. गुरुवारी २४ तासात देशभरात ८६ हजार ०५२ नवीन रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे देशातील बाधितांची संख्या ५८ लाख १८ हजार ५७१ वर पोहोचली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यामागील एक कारण म्हणजे चाचणीची संख्या देखील आहे. भारतातील कोरोना चाचणी वाढल्यामुळे संख्या देखील वाढली आहे. काल एका दिवसात तब्बल १५ लाख कोरोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी चाचणी आहे. त्यातील ८६ हजार ०५२ जण पॉझिटिव्ह आले. देशात आतापर्यंत ७ कोटींच्या जवळपास चाचण्या झाल्या आहेत.

देशात सध्या ९ लाख ७० हजार ११६ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. ४७ लाख ५६ हजार १६५ कोरोनाबाधीतांनी कोरोनावर मात केली आहे. दुर्दैवीबाब म्हणजे आतापर्यंत ९२ हजार २९० बाधितांना जीव गमवावा लागला आहे.