शहादा : येथील वन विभागाच्या अधिका-यांनी वाघाच्या कातडीची तस्करी करणारी टोळीला बसस्थानका जवळ सापळा रचुुन मुद्देमालासह चार जणाांना गजाआड केेेेले
शहादा वन विभागातील अधिका-यांना गुप्त बातमीनुसार गुजरात राज्यातून वाघाची कातडी , नखे विक्री होणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार शहादा बसस्टँड येथे ३ आरोपींना वाघाची कातडी व नखे सहित दिनांक २ ९ / ०४ / २०२३ रोजी रात्री १०.३० वाजता अटक करण्यात आले . चौकशी अंती ज्या आरोपीला सदर वाघाचे अवयव विक्री केले जाणार होते , त्या आरोपीला देखील त्याच वेळी अटक करण्यात आली . सदर कार्यवाही मध्ये एकूण ४ आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपी रामचंद्र गोविंदा जाधव ,( वय- ४० वर्ष , रा . मोराने , ता . सटाणा जि . नाशिक) , रामा सायसिंग उमरे , (वय २५ वर्ष , रा . चिपी , ता . सटाणा जि . नाशिक) , सुखीराम महारु भदाणे , (वय – ४५ वर्ष , रा . बंधारपाडा , ता . साक्री जि . धुळे) , चंदन शमनलाल डेटवाणी , (वय २७ वर्ष रा . शहादा जि . नंदुरबार ) सदर आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आले असुन त्यात वन्यप्राणी वाघाची कातडी १ नग , वाघाची नखे – २० नग ताब्यात घेण्यात आले . सदर आरोपी हे मोठे तस्कर असून आरोपी विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १ ९ ७२ च्या विविध कलमा अंतर्गत वन गुन्हा क्र . ०१/२०२३ दिनांक २ ९ / ०४ / २०२३ अन्वये वन गुन्हा नोंदवण्यात आला . सदर आरोपींना शहादा कोर्टात हजर केले असता दिनांक ०४/०५/२०२३ पर्यंत वन कोठडी मिळाली असून पुढील तपास सुरु आहे . सदर कार्यवाहीत कृष्णा भवर , उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली संजय साळुंके , (सहा . वनसंरक्षक अक्राणी) , आशुतोष मेढे (वनक्षेत्रपाल शहादा) , एस . एन . पाटील (वनपाल दरा) , डी . बी . जमदाळे (वनपाल जयनगर) , वनरक्षक एस . जी मुकाडे , ए . एन तावडे , आर . जी . वसावे , एफ.एन. वसावे , बालाजी इंगळे , दीपक पाटील , वाहन चालक नइम मिर्जा , विक्रम पानपाटील यांनी सदर कार्यवाही मध्ये सहभाग नोंदवून यशस्वीरित्या आरोपींना जेलबंद करून वन्यप्राणी वाघाचे अवयव हस्तगत करून यशस्वी कार्यवाही केली आहे . सदर वन गुन्ह्याच्या अनुषंगाने एस . डी साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल आशुतोष मेढे पुढील तपास करत आहे.