गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणाऱ्या क्वालिफायर २ सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गुजरातच्या शुबमन गिलने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत आयपीएल २०२३ मध्ये तिसरं शतकं ठोकलं. शुबमन गिलने ६० चेंडूत १० षटकार आणि ७ चौकारांच्या जोरावर १२९ धावांची वादळी शतकी केली. तसंच साई सुदर्शननेही जबरदस्त फलंदाजी करत ४३ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्याने १३ चेंडूत २८ धावांची नाबाद खेळी केली. या धावांच्या जोरावर गुजरातने २० षटकात २ विकेट्स गमावत २३३ धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे मुंबईला विजयासाठी २० षटकात २३४ धावांचं तगडं लक्ष्य गाठावं लागणार होतं. परंतु, गुजरातच्या मोहित शर्माने आणि मोहम्मद शमीने भेदक गोलंदाजी केल्यामुळं मुंबई इंडियन्सचा संघ १७१ धावांवर गारद झाला. त्यामुळे मुंबई इंडियन्स आयपीएलमधून बाहेर पडली असून गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जविरोधात फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
मुंबई इंडियन्ससाठी कॅमरून ग्रीन (३०), सूर्यकुमार यादव (६१) आणि तिलक वर्मा (४३) यांनी खिंड लढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रोहित शर्मा (८), नेहल वढेरा (४), विष्णू विनोद (५) यांच्यासह इतर सर्व फलंदाज स्वस्तात माघारी परतले आणि मुंबईचा पराभव झाला. गुजरातसाठी मोहम्मद शामीने २, राशिद खानने २, जोशिल लिटिलने एक तर या सामन्यातील हिरो ठरलेल्या मोहित शर्माने पाच विकेट्स घेतल्या. गुजरातचे सलामीचे फलंदाज शुबमन गिल आणि ऋद्धीमान साहाने अप्रतिम फलंदाजी करून मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.
Magical Mohit!
An outstanding five-wicket haul, giving away just 10-runs in a match-winning occasion ????????????????#TATAIPL | #Qualifier2 | #GTvMI pic.twitter.com/tkEJWkPY9w
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2023
पॉवर प्ले मध्ये दोन्ही फलंदाजांनी सावध खेळी केल्याने मुंबईला विकेट मिळाली नाही. परंतु, त्यानंतर सहाव्या षटकात पीयुष चावलाने ऋद्धीमान साहाला १८ धावांवर बाद केलं. शुबमन गिलने ६० चेंडूत १० षटकार आणि ७ चौकारांच्या जोरावर १२९ धावांची वादळी शतकी केली. तसंच साई सुदर्शननेही जबरदस्त फलंदाजी करत ४३ धावा केल्या. कर्णधार हार्दिक पांड्याने १३ चेंडूत २८ धावांची नाबाद खेळी केली. या धावांच्या जोरावर गुजरातने २० षटकात २ विकेट्स गमावत २३३ धावांपर्यंत मजल मारली होती.