नमाज पठण करण्यास नकार दिल्याने तरुणीची हत्या

0

मुंबई- नमाज पठण करण्यास नकार दिल्याने मुंबईतील अॅन्टॉप हिल परिसरात अल्पवयीन तरुणीची हत्या करण्यात आली आहे. तरुणीच्या नातेवाईंकांकडूनच तरुणीची गळा आवळून हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी तीन महिलांना अटक केली असून एका अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.

तरुणीच्या कुटुंबियांना तिला प्रत्येक शुक्रवारी नमाज पठण करण्यास सांगितले होते. मात्र तरुणीने त्याला स्पष्ट नकार दिला होता. शुक्रवारी जेव्हा पुन्हा एकदा तिने नमाज पठण करण्यास नकार दिला तेव्हा तिच्या काकीने संतापाच्या भरात दुपट्ट्याच्या सहाय्याने तिचा गळा दाबला आणि हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हत्या केल्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी नातेवाईकांनी सायन रुग्णालयातील डॉक्टरांना बाथरुममध्ये घसरुन मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली. पण डॉक्टरांनी मृतदेहाची पाहणी केली असता त्यांचा विश्वास बसला नाही. तरुणीच्या गळावर असलेले वण पाहिल्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना फोन करुन कळवलं. पोलिसांनी कसून चौकशी केली असता तरुणीच्या काकीने गुन्ह्याची कबूली दिली.

शुक्रवारी जेव्हा तरुणीने नमाज पठण करण्यास नकार दिला तेव्हा नातेवाईक रागावले आणि हत्या केली. तिघांना अटक करण्यात आली असून तिघेही तिचे नातेवाईक आहेत. तरुणीचे वडिल गरिब असून एक वेळच्या जेवणाचीही मारामार आहे. त्यातच आईचे निधन झालेले असल्याने तरुणी नातेवाईकांसोबत राहत होती. आपल्या मुलीची हत्या झाल्याचं ऐकल्यावर तिच्या वडिलांना धक्का बसला असून, तिला नातेवाईकाच्या ताब्यात दिल्याचा पश्चाताप करत आहेत