यावल, रावेरसह बोदवड तहसीलदारांचा गौरव

0

भुसावळ- ऑनलाईन डिजिटल स्वाक्षरी असलेल्या सातबाराचे शंभर टक्के काम पूर्ण करणार्‍या फैजपूरचे प्रांताधिकारी अजित थोरबोले, यावलचे तहसीलदार कुंदन हिरे व रावेरचे तहसीलदार विजयकुमार ढगे, बोदवड तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यासह एरंडोलच्या तहसीलदार सुनीता जर्‍हाड, भडगावचे तहसीलदार छगन वाघ यांचा कृषि, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या उपक्रमात जळगाव जिल्ह्यातील 1503 गावांपैकी 1456 गावांमध्ये हे काम पूर्ण झाले आहे. संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरी असलेल्या सातबाराची कामे महसूल यंत्रणेने पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री, महसुलमंत्र्यांनी तलाठ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उप जिल्हाधिकारी अभिजीत भांडे-पाटील, जितेंद्र पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, यांच्यासह निवडक मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.