कोरोनाचा फैलाव होण्यास मोदी सरकार जबाबदार; ‘गोल्डेन महिना’ गमावला: कॉंग्रेस

0

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने थैमान घातला आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. भारतात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. देशात सहा महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. चीनमध्ये कोरोनाचा शिरकाव होऊन दहा महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटून गेला. मात्र मोदी सरकारला चीन आपले शेजारी देश असल्याचा विसर पडला. WHO ने डिसेंबर २०१९ पासून जगाला सावध केले होते. त्याचवेळी मोदी सरकारने खबरदारी घेतली पाहिजे होती. मात्र कोरोनाला रोखण्याचा ‘हा’ गोल्डन महिना मोदी सरकारने गमावला असे आरोप कॉंग्रेसने केले आहे. कॉंग्रेस नेते गुलामनबी आझाद यांनी आज गुरुवारी १७ रोजी राज्यसभेत बोलतांना मोदी सरकारला कोरोनाचा फैलाव होण्यास जबाबदार धरले.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी डिसेंबरमध्ये सरकारला सतर्क राहण्याचे सुचविले होते, मात्र सरकारने ते केले नाही असे गुलामनबी आझाद यांनी सांगितले.