सोन्याच्या दराने गाठले उच्चांक !

0

मुंबई: सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. सोन्याचे भाव ३४ हजार ७०० रुपयाचा टप्पा ओलांडला आहे. काही दिवसात सोन्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता सराफ बाजारात वर्तवली जात आहे. डिसेंबर अखेर सोन्याच्या दरात ३ हजार रुपयांची वाढ होऊ शकते. सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक भविष्यात फायद्याची होऊ शकते, असे भाकीत वर्तवले जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचा जून महिन्यातील दर पाहता १९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत निघाला. याआधी १९ वर्षांपूर्वी याच महिन्यात सोन्याचा दर १ हजार ४३० डॉलरवर जाऊन पोहोचला होता. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला असता भारतात सोन्याचे दर ६ डॉलरने कमी आहेत असे केडिया कमोडिटीचे संचालक अजय केडियांनी सांगितले.

भारत देशात सगळ्यात जास्त सोने खरेदी होते. जूनमध्ये अमेरिकन डॉलरचे मूल्य घटल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली आहे असे सांगितले जात आहे. अमेरिकेतील बँकांनी व्याजदरात कपात केली असून त्या मुळे गुंतवणूकदारांनी सोने खरेदी सुरु केली आहे.