नवी दिल्ली- अलीगड मुस्लीम यूनिवर्सिटी (एएमयू) मध्ये जिन्ना वादामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा अहवाल लोकल इंटेलिजेंस यूनिट (एलआईयू) ने जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. अहवालानुसार शहरातील परिस्थिती नाजूक आहे. मुस्लीम बहुल क्षेत्रात घोषणाबाजी करण्यात आल्यामुळे वातावरण चिघळले असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. हा अहवाल सीओ सतीश चंद्र पांडेय यांनी दिला आहे.
लोकल इंटेलिजेंस यूनिटने जिला प्रशासनाला पाठविलेल्या अहवालात ६ में ला हिंदू जागरण मंचच्या कार्यकर्तानी भुजपुरा, बाबरी मंडी, चंदन शहीद रोड, काला महल, डाक खाना जयगंज या ठिकाणी मोटारसायकल रॅली काढण्यात आली या रॅलीत अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे तणाव वाढले. वारंवार होत असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीगढ़ प्रशासनाकडून अहवाल मागविला आहे.
भाजप खासदार सतीश गौतम याने कुलगुरू प्रा.तारिक मंसूर यांना पत्र लिहून विद्यापीठात कोणत्या कारणाने जिना यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. कोठे कोठे फोटो लावण्यात आले आहे, जिना भारत पाकिस्तान विभाजनाचे मुख्य सुत्रदार असल्याने त्याचे छायाचित्र का लावण्यात आले आहे याची माहिती मागविली. यावरून हा वाद अधिकच चिघळला.