टाइम’ मॅगेझीनने जगातील सर्वात प्रभावी १०० लोकांची यादी जाहीर केली आहे. यात जगभरातील राष्ट्रप्रमुख, उद्योगपती, कलाकार, गायक, खेळाडू, लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, वैज्ञानिक, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे.
या यादीत भारतातून केवळ दोन व्यक्तींचा समावेश झाला आहे. यात अभिनेता शाहरूख खान आणि दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे याआधी या यादीत समावेश असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा यावर्षी यादीत समावेश नाही.
शाहरूख आणि राजामौली यांच्याशिवाय या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, टेस्लाचा प्रमुख एलॉन मस्क, किंग्ज चार्ल्स, लेखक सलमान रश्दी, न्यायमूर्ती पद्मलक्ष्मी इत्यादींचाही समावेश आहे. विशेष म्हणजे यंदा प्रभावी व्यक्तींच्या यादीत पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विक्रमी १६ लोकांचा समावेश आहे.