प्रियकराने महिलेच्या डोक्यात घातला हातोडा

0

पुणे- प्रियकराने विधवा महिलेला शिवीगाळ करत डोक्यात हातोडा घातला. हा प्रकार भोसरी, चांदणी चौकातील एका लॉजवर घडला. याप्रकरणी सुनील कुंभार (रा. कसगाववाडी, लोणावळा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 35 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. आरोपी सुनील तिच्या पतीचा मित्र होता.

आरोपी आणि फिर्यादी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. त्यानंतर महिला आरोपीला टाळत होती. आरोपीने बुधवारी रात्री भोसरी, चांदणी चौकातील एका लॉजवर महिलेला बोलावून घेतले. ’तू मला का टाळत आहेस’ असे म्हणत तिला शिवीगाळ करत डोक्यात हातोडी मारून गंभीर जखमी केले, असे पोलिसांनी सांगितले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.