महाराष्ट्रासाठी पुढचे ४८ तास धोक्याचे, अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाची हवामान खात्याने वर्तवली शक्यता…

मुंबई ः राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. अशात मे महिना आला तरी अवकाळी पावसाचा तडाखा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये कडक उन्हामुळे नागरिकांचे हाल झाले आहे. या सगळ्यात वारंवार होणाऱ्या हवामान बदलांमुळे महाराष्ट्रातील काही भागाला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामानात वारंवार होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम हा रोजच्या हवामानावर होत असतो. यामुळेच यंदा झालेल्या अवकाळी पावसाने बळीराजा चिंतेत आहे. अशात आता हवामान खात्याकडून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह कोणत्या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने ऊन आणि पावसाचा इशारा दिला आहे? वाचा सविस्तर…

खरंतर, महाराष्ट्रासह इतरही राज्यांमध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, कोकण किनारपट्टीच्या भागात हवेतील आर्द्रतेचं प्रमाण अद्याप कमी न झाल्यामुळे नागरिकांना उन्हाचा आणखी तडाखा सहन करावा लागणार आहे. तर पुढच्या ४८ तासामध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्याने आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.