पंचविस वर्षा पासून महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

मुक्ताईनगर प्रतिनिधी…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा रौप्य महोत्सवी वर्धापनदिनानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय मुक्ताईनगर येथे तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील यांच्या हस्ते पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले

यावेळी रोहिणी खडसे यांनी उपस्थित

पदाधिकारी, कार्यकर्ते बंधु भगिनींना पक्षाच्या वर्धापनदिना निमित्ताने शुभेच्छा दिल्या यावेळी त्या म्हणाल्या पंचवीस वर्षा पूर्वी शरद पवार यांनी लावलेल्या रोपट्याचे

आज वटवृक्षात रूपांतर झाले असून

कष्टकरी, शेतकरी

माता भगिनी आणि युवकांसाठी

आपणा सर्वांसाठी

गेले पंचविस वर्षा पासून महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे

सत्ता असो अथवा नसो शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घौडदौड सुरू आहे

 

फुले-शाहू-आंबेडकर आदी थोर व्यक्तीमत्वांच्या विचारांवर चालणारा पक्ष असून सर्व जाती धर्मातील व्यक्तीला या पक्षात न्याय मिळतो

कितीही कठिण प्रसंग आले तरी महाराष्ट्रातील जनता सदैव शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभी राहिली

आगामी काळात सुद्धा आपल्या सर्वांच्या मेहनतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत येईल असा विश्वास रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला

 

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार,शहराध्यक्ष राजेंद्र माळी,युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे,बाजार समिती सभापती सुधिर तराळ,प्रवक्ता सेल संयोजक विशाल महाराज खोले,निलेश पाटील, रामभाऊ पाटील,किशोर चौधरी,मधुकर गोसावी,रविंद्र दांडगे,प्रविण पाटील, बापु ससाणे, एजाज खान,बाळा भालशंकर,विकास पाटील,नंदकिशोर हिरोळे,रउफ खान,सुनिल पाटील,भावराव पाटील,सोनु पाटील, प्रविण दामोदरे, प्रदिप साळुंखे, संजय कपले,विशाल रोटे,राहुल पाटील,निलेश भालेराव,हाशम शहा, अय्याज पटेल, मुश्ताक मण्यार,जुबेर अली फिरोज सैय्यद ,वहाब खान, अख्तर मण्यार,हर्षल झोपे, प्रभाकर झोपे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते