नवा कोरोनाविषाणू पाचशे पट अधिक धोकादायक

जि.प.चे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पोटोडे यांची पत्र परिषदेत माहिती जि.प.चे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पोटोडे यांची पत्र परिषदेत माहिती ‘ ’चे संक्रमण रोखण्यासाठी दोन्ही डोस गरजेचे

is जळगाव। कोरोनाचे अल्फा, डेल्टा आता मागे पडले आहे. आता त्यांची जागा नव्या व्हेरींएटं ‘ओमिक्रोन’ नावाच्या विषाणूने घेतली आहे. आफ्रिकेत हे नवे संकट आले आहे. हे संक्रमण जगात सुसाट वेगाने पसरत असल्याचे जाणकारांचे मत आहे. म्हणून महाराष्ट्रातही चिंता व काळजी वाढली आहे. हा नवा कोरोनाविषाणू पाचशे पटीने अतिशय धोकादायक मानला जातो. म्हणून नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. नव्या व्हेरींएटंला दूर ठेवण्यासाठी राज्यातील प्रशासन सज्ज झाले आहे. ‘ओमिक्रोन’चे संक्रमण रोखण्यासाठी लसीकरण करुन घेणे गरजेचे असल्याचे जि.प.चे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पोटोडे यांनी सोमवारी, 29 नोव्हेंबर रोजी पत्र परिषदेत दिली.

‘ओमिक्रोन’चा धोका लक्षात घेता पुन्हा नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी ‘डबल लेयर’ मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझर आदी नियमावली पाळावे लागणार आहे. जगात सर्वत्र सावधानता पसरली आहे. ‘ओमिक्रोन’चा विषाणू सर्वात भयावह म्हणून उल्लेख केला जात आहे. नव्या व्हेरीएंटचा जळगाव जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. परंतु त्याच्या संक्रमणाचा वेग लक्षात घेता सर्वांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेेणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे लसीकरण वेगाने झाले पाहिजे.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे पहिला डोस घेणार्‍यांची 67.89 टक्केवारी तर दुसरा डोस घेणार्‍यांची 26.84 टक्केवारी सद्यस्थितीला आहे. जिल्ह्यात पहिला डोस घेणार्‍यांची सर्वात कमी टक्केवारी बोदवडची असून 58.79 इतकी आहे. तसेच दुसरा डोस घेणार्‍यांची सर्वात कमी टक्केवारी जामनेरची असून ती 18.66 इतकी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन्ही डोस घेणार्‍यांची संख्या 32 लाख 27 हजार 92 इतकी आहे.

‘ओमिक्रोन’ विषाणूचा रुग्ण मुंबईपर्यंत पोहोचला
‘ओमिक्रोन’ विषाणूची संक्रमणाची क्षमता वेगाची मानली जात आहे. या विषाणूचा रुग्ण मुंबईपर्यंत पोहोचला आहे. यामुळे बाहेर देशातून येणार्‍या नागरिकांमुळे धोका वाढण्याची शक्यता पुन्हा वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्री, जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित यंत्रणेला खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. अशातच जिल्हा आरोग्य विभागाने ‘हर घर दस्तक’ आणि कुटुंबांचे सर्वेक्षण अशा मोहिमांवर भर दिला आहे. त्याद्वारे रोज 30 ते 40 लोकांना लसीकरण केले जात आहे.

जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढणे गरजेचे
‘ओमिक्रोन’ विषाणू हवेतून फैलाव करीत असल्यामुळे त्याचे संक्रमण वेगाने होते. या विषाणूवर अद्याप घातक असा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी दोन्ही डोस घेऊन दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र जवळ बाळगणे आवश्यक झाले आहे. दोन्ही डोस न घेणार्‍यांवर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई होत असल्याचे प्रकार समोर येत आहे. ‘ओमिक्रोन’ विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी दोन्ही डोस घेण्याचे आवाहनही आरोग्य विभागाने केले असल्याचे डॉ.दिलीप पोटोडे यांनी पत्र परिषदेत सांगितले.