पोकरा योजनेची नूतन फेज २ गाव निहाय यादी प्रसिध्द !  

पोकरा योजनेची नूतन फेज २ गाव निहाय यादी प्रसिध्द !  

 …तर उर्वरित गावे देखील समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदारांनी सांगितले.

मुक्ताईनगर प्रतिनिधी l

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अंतर्गत असलेल्या पोकरा योजनेची नूतन फेज २ गाव निहाय यादी प्रसिध्द झाली असून आ.चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी मुक्ताईनगर मतदार संघातील बोदवड,रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील ५९ गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. परंतु या योजनेपासून वंचित असलेली उर्वरित गावे देखील समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अंतर्गत असलेल्या राज्यातील पोकरा योजनेतील फेज २ ची गाव निहाय यादी प्रसिद्ध केलेली असून यात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने व वेळोवेळी केलेल्या पत्र व्यवहारामुळे मुक्ताईनगर मतदार संघातील सुमारे 59 गावांचा यात समावेश करण्यात आलेला असून बोदवड तालुक्यातील तसेच मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील आणखी मागणी असलेले काही गावे नवीन फेज यादीत सुटलेली असून नवीन यादीत उर्वरित गावे देखील समाविष्ट करून घ्यावी यासाठी आमदार चंद्रकांत पाटील कृषी मंत्री सत्तारांकडे पाठपुरावा करणार आहेत.

दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की बोदवड तालुका हा 100% अवर्ष प्रवणग्रस्त असल्याने तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान अत्यंत वेदनादायी आहे त्यामुळे या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी या भागातील शेती क्षेत्र आधुनिकतेकडे नेण्यासाठी सदरील आणखी काही गावांचा समावेश असणे अत्यंत गरजेचे होते परंतु नवीन प्रसिद्ध झालेल्या यादीत ही गावे नसल्याने माझ्यासह शेतकरी वर्गामध्ये नाराजी आहे त्यामुळे उर्वरित गावांचा तातडीने या योजनेत समावेश करून घेण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये बोदवड तालुक्यातील १)धानोरी, २)मुक्तळ ,३)वराळ बुद्रुक ४)वराड खुर्द ५) बोरगाव ६)वाकी ही गावे आहेत तर मुक्ताईनगर तालुक्यातील ७)अंतूर्ली ,८)बेलसवाडी ९)भोटे १०)चांगदेव ११)चिखली १२)चिचखेडे खुर्द १३)चिचखेडे बुद्रुक १४)धुळे १५)तालखेडे १६)चिंचोल १७)बेलखेड १८)भोकरी १९धामणदे, २०) दुई २१)घोडसगाव २२)कुंड २३)हलखेडे २५)हिवरे २६) उमरे २७)बहादुरपूर (पावरीवाडा) २८जोंधनखेडे २९)खामखेडे ३०) कोऱ्हाळा,३१) कुऱ्हा ३२) मेहुण ३३) मेळसांगवे ३४)मेंढोदे ३५)मुक्ताईनगर ३६)नांदवेल ३७)नरवेल ३८)नायगाव ३९)पंचाने ४०)पारंबी ४१)पातोंडी ४२)पिंप्राळे ४३) पिंप्रीनांदू ४४)पिंप्री पंचम ४५) पुरणाड ४६) शेमळदे, ४७) डोलारखेडे ४८)सुकळी ४९)रिगाव ५०)सुळे ५१)थेरोळे ५२) उचंदे तसेच रावेर तालुक्यातील ५३) वाघोदे, ५४) गहूखेडे,५५) रायपूर, ५६) रणगाव ५७) सुदगाव, ५८) तासखेडे, ५९) उदळी खु. या गावांचा समावेश आहे.