नूतन प्रांत अधिकारी मा.श्री जितेंद्र पाटील यांचे पर्यावरण जागर प्रतिष्ठान तर्फे अडुळशाचे रोप देऊन केले स्वागत…..
भुसावळ
नुकतेच नगर येथून बदली होऊन आलेले भुसावळ विभागाचे नूतन प्रांताधिकारी माननीय श्री जितेंद्र पाटील यांची भुसावळ नगर परिषदेचे ब्रँड अँबेसिडर तथा पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नाना पाटील सर व संचालक सुरेंद्र सिंग पाटील यांनी भेट घेऊन त्यांचे आयुर्वेदिक वनस्पती अडुळशा व गुलाबाचे रोप देऊन स्वागत केले यावेळी माननीय प्रांताधिकारी यांनी पर्यावरण जागर प्रतिष्ठान राबवत असलेल्या उपक्रमाविषयी माहिती करवून घेतली .त्याचप्रमाणे पुढील वर्षी वृक्ष लागवडी संदर्भात चर्चाही केली .पर्यावरण जागर प्रतिष्ठान तर्फे स्वागत सत्काराला व विविध प्रसंगी वृक्ष भेट देणे ही योजना त्यांना आवडली कारणही भेट कायम टिकणारी असते या उपक्रमाचे त्यांनी कौतुकही केले अडुळसा या आयुर्वेदिक वनस्पतीचे महत्व त्यांनी यावेळी समजून घेतले . त्याचबरोबर अस्थी व रक्षाविसर्जनातून स्मृतीचे वृक्ष लावूया या उपक्रमाविषयी अधिक माहिती जाणून घेतली या उपक्रमाला नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे हे त्यांनी जाणून घेतले . भविष्यात पर्यावरण पूरक कार्य एकत्र करूया असे सांगून पर्यावरण कार्याला शुभेच्छा दिल्या .