कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार सुरुच; आज पुन्हा रुग्ण वाढले

0

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरतांना दिसत आहे. दररोज ८५ हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत होते, त्यात काही प्रमाणात घट झाल्याचे चित्र आहे. मागील दोन आठवड्यापासून रुग्ण संख्या घटली आहे. मात्र त्यातही चढ-उतार आहे. दोन दिवसांपूर्वी रुग्ण संख्येत प्रचंड मोठी घट झाली होती. त्यानंतर काल पुन्हा आकडे वाढले. काल ६३ हजार ५०९ नवे करोना रुग्णांची नोंद झाली होती. दरम्यान आज आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुन्हा ९७ हजार ७०८ रुग्णांची नोंद झाली आहे. मागील २४ तासांत देशात ६८० बाधितांचा मृत्यू झाला आहे.

यासोबत देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या ७३ लाख ७ हजार ०९८ वर पोहोचली आहे. कोरोना बाधितांच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. मात्र रिकव्हरीच्या बाबतीत भारत जगात अव्वल आहे. देशात सद्या ८ लाख १२ हजार ३९० अॅक्टिव्ह रुग्ण आहे. टक्केवारीत मोजायचे झाल्यास सध्या ११.१२ टक्के रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. ६३ लाख ८३ हजार ४४२ (८७.३६ टक्के) रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या १ लाख ११ हजार २६६ इतकी झाली आहे.