भारतात जापनीज कंपनीची संख्या वाढली; सध्या १४४१ कंपन्या कार्यरत

0

नवी दिल्ली-भारतात विदेशी व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जपान देशाची भारतात सुरु असलेल्या कंपनीच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतात जपानच्या कंपनींची संख्या आता १४४१ वर पोहोचली आहे अशी माहिती भारतील जापानच राजदूत केंजी हीरामात्सु यांनी दिली.

हीरामात्सुने केंद्रीय उद्योग मंत्री सुरेश प्रभु यांच्याशी संवाद साधतांना भारतात जापनीज कंपन्या वाढल्या आहे अशी माहिती दिली. ऑक्टोंबर २०१८च्या शेवटी ही संख्या १४४१ वर पोहोचली आहे. मागील वर्षापेक्षा ही संख्या ५ टक्के वाढली आहे.