हिमांशू रॉय यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0

मुंबई : राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि एसटीएसचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांच्या आत्महत्येने संपूर्ण पोलीस दलाला मोठा हादरा बसला आहे. त्यांच्यावर गिरगावच्या चंदनवाडी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी पोलीस महासंचालक सतीश माथूर आणि सह पोलीस आयुक्त देवेन भारती हे उपस्थित होते तर त्यांच्यासोबतच अमीन पटेल, बाळा नांदगावकर, रामदास आठवले यांनीही उपस्थिती लावली होती.

दीर्घ आजाराला कंटाळून हिमांशू रॉय यांनी आपलं जीवन संपवलं. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. हिमांशू यांनी त्यांच्या राहत्या घरी स्वत: वर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. त्यांच्या या आत्महत्येमुऴे संपूर्ण पोलिस दलामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.