सोनसाखळी लांबविणाऱ्या सराईत महिलेला पोलिसांनी केली अटक.
आरोपी महिला बीड जिल्ह्यातील., १२ ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल.
मुक्ताईनगर प्रतिनिधी
बस स्थानक व इतर गर्दीच्या ठिकाणावर महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करणाऱ्या बीड जिल्ह्यातील सराईत महिलेला मुक्ताईनगर पोलिसांनी 15 मे रोजी अटक केली होती सदर महिलेवर बीड येथे एक व नाशिक येथे 11 ठिकाणी सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सदर आरोपी महिलेला 16 मे रोजी भुसावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
बस स्थानक तसेच इतर गर्दीच्या ठिकाणावरून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीचे प्रकार अलीकडे भरपूर वाढलेले आहेत असाच प्रकार मुक्ताईनगर बस स्थानक येथे 15 मे रोजी सकाळी पावणेदहा वाजता घडला.
अंजली निलेश बाफना राहणार छत्रपती संभाजीनगर हल्ली मुक्काम मुक्ताईनगर ही महिला 15 मे रोजी मुक्ताईनगर बस स्थानक येथून बस मध्ये चढत असताना केसर सुकदेव जाधव वय 50 राहणार चऱ्हाटा तालुका राजुरी जिल्हा बीड हल्ली मुक्काम गांधीनगर बीड या महिलेने अंजली बाफना यांच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाची गंठण ( मंगळसूत्र) किंमत दोन लाख दहा हजार रुपये ही पोत तोडून चोरी केली बाफना यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरोड केली केसर जाधव या महिलेने पोत जागेवर फेकून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु तिला पकडण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे यांनी बीड येथे पोलीस स्टेशन व ऑनलाइन पोलीस तपास केला असता सदर महिलेवर बीड येथे एक व नाशिक येथे अकरा ठिकाणी सोनसाखळी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. केसर जाधव या महिलेकडून सोनसाखळी पोलिसांनी हस्तगत केली आहे. याप्रकरणी अंजली बाफना यांचे फिर्यादीवरून केसर सुकदेव जाधव राहणार बीड या महिलेविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहे.