मुक्ताईनगर । प्रतिनिधी
बकरी ईदच्या सणानिमित्त मोठ्या प्रमाणात कत्तलीसाठी अवैधरित्या गुरांची वाहतुक केली असल्याने पोलीस प्रशासनाच्या माध्यमातुन ठिकठिकाणी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी केली जाते. याच प्रकारे पुरनाड चेकपोस्टवर तपासणी दरम्यान गुरांची अवैधरीत्या वाहतुक करणारे वाहन पोलीसांनी रात्री पकडले असुन दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
जळगांव जिल्ह्यात मध्यप्रदेश या राज्यातून रावेर व मुक्ताईनगर मार्गे गुरांची तस्करी केली जाते. यामध्ये बकरी ईदच्या सणानिमित्त मोठ्या प्रमाणात कत्तलीसाठी गोवंशाची तस्करी केली जात असल्याने पोलीस प्रशासनाच्या माध्यमातुन ठिकठिकाणी नाकेबंदी करून वाहनांची तपासणी केली जाते. अशाच प्रकारे सोमवारी मध्यरात्री पोलीस नाईक नंदकिशोर रामराव धनके, चंद्रशेखर सुरंगे व होमगार्ड प्रशांत पाटील यांनी एम.एच.१५ / एफ व्ही -४०५३ या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये सहा गोवंशाची गुरे आढळुन आली. यामुळे विशाल ईश्वर वाघ ( वय – २१ ) व साकीर अली रियाज अली ( वय -१९ ) दोघे रा. इच्छापूर ( बऱ्हाणपूर) मध्यप्रदेश यांना ताब्यात घेऊन ६४ हजार रुपयांची गुरे व एक लाख ५० हजार रुपयांचे वाहन असे दोन लाख १४ हजार रुपयांची कारवाई करण्यात आली.
सदर इसमाना गुरे कुठे घेऊन जात आहे अशी विचारणा केली असता मुक्ताईनगर येथील मस्तान शेठ यांचे कडे घेऊन जात असल्याचे सांगितले.
या प्रकरणाचा तपास सपोनि संदिप दुनगहू करीत आहेत.