प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पाचोरा: राज्यात सर्वत्र सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गिरणा धरणातुन सकाळी साडेआठ वाजता ७७ हजार, ५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. गिरणा धरणावर असलेल्या नागासक्या, हरणबारी, तर पाचोरा तालुक्यातील अग्नावती व इतर लहान मोठे धरण नदी नाले ओसंडून वाहत असल्याने हा विसर्ग सुमारे १ लाख क्युसेक पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गिरणा नदीला महापूर येणार असून प्रशानातर्फे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्याने पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, सकाळी सात वाजता धरणातून ७५ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. तर मन्याड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. लाभक्षेत्रात ही पाऊस सुरु असल्याने नदीपात्रात ९० हजार क्युसेकने पाणी असणार आहे. त्यामुळे गिरणा नदीला पुर आला आहे.
गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी पाऊस झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. रात्रीपासून या पाण्यात सातत्याने वाढ होत आहे. धरणातून सकाळी सात वाजेपर्यंत ७५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्रकुमार बेहेरे यांनी सांगितले. तर मन्याड धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.