मध्यप्रदेशात कॉंग्रेस, बसपा आघाडीची शक्यता

0

नवी दिल्ली: मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि बहुजश समाज पार्टीशी आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमालनाथ यांनी सांगितले आहे. भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेस आणि बसपा एकत्र येणे गरजेचे आहे असे कमलनाथ यांनी आधीच स्पष्ट केले होते.

चर्चा अंतिम टप्यात

कर्नाटकमध्ये जेडीएस आणि काँग्रेस आघाडी सरकारच्या शपथविधीच्या वेळी सोनिया गांधी आणि मायावती यांच्यातला सलोखा पाहायला मिळाला होता. मध्यप्रदेशात बसपाला गेल्या तीन निवडणुकांमध्ये सातत्याने सात टक्के मतदारांचा पाठिंबा मिळत आला आहे. काँग्रेसला २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत साधारण ३७ टक्के मते मिळाली होती. तर भाजपाला २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत ४५ टक्के मते मिळली होती. दरम्यान, पंधरा वर्षे सातत्याने सत्ता असल्याने प्रस्थापितांच्या विरोधात असणाऱ्या मतांचा फायदा घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेसची बसपाशी चर्चा सुरु असून येत्या काही दिवसातच अतिंम चित्र स्पष्ट होईल.