बिहारमध्ये सोन्याचा साठा सापडण्याची शक्यता, भूवैज्ञानिकानी उत्खणांनास केली सुरवात, इंग्रजानीही केला होता प्रयत्न !
बिहारमध्ये सोन्याचा साठा सापडण्याची शक्यता, भूवैज्ञानिकानी उत्खणांनास केली सुरवात, इंग्रजानीही केला होता प्रयत्न !
भिवंडी l
बिहारमधील बांका जिल्ह्यात हजारो टन सोन्याचा साठा सापडण्याची शक्यता हिंदुस्थानी भूवैज्ञानिकांनी सर्वेक्षणादरम्यान व्यक्त केली आहे. येथे जमिनीच्या खाली दडलेल्या मोठ्या प्रमाणात असलेल्या सोन्याच्या साठ्याचा शोध घेण्याबाबत भूवैज्ञानिकांचे सर्वेक्षण सुरू आहे. या भागात आतापर्यंत ६५० फूटांपर्यंत उत्खनन करण्यात येणार असून आतापर्यंत ५० ते ६० फुटांपर्यंत खोदकाम झाले आहे. येथे वैज्ञानिकांना सध्या सोनेरी चमकदार दगड आणि काही खनिज सापडत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बिहारमधील बांका जिल्ह्यातील कटोरिया ब्लॉकमधील खेरवार गावात जमिनीखालून काही तेजस्वी आणि सोनेरी रंगाचे दगड बाहेर पडत होते. त्यामुळे या गावातील लोकांचा हा चर्चेचा विषय बनला होता. हे दगड बघून गावातील जमिनीत हजारो टन सोने दडले गेले असण्याची शक्यता आहे आणि खरोखरच जमिनीच्या खाली सोन्याचा प्रचंड साठा सापडल्या या भागातील जनतेचे नशीब नक्कीच बदलू शकते, असा विश्वास येथील गावकऱ्यांनीही व्यक्त केला.
भारत सरकारच्या जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या टिमला याबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी त्यांनी संपूर्ण परिसराचे हवाई सर्वेक्षण केले. या परिसरात जमिनीखाली हजारो टन सोने असण्याची शंक त्यांनी आली. त्यामुळे त्यांनी गेल्या ४/५ दिवसांपासून येथे खोदकाम सुरू केले.याकरिता कलकत्त्यातील हिंदुस्थानी भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे अभियंते खेरवार गावात आले. त्यांनी येथे तळ ठोकून खोदकामाला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या भागात ६५० फूट खोदकाम करावे लागणार असून,आतापर्यंत ५० ते ६० फूट खोदकाम झाले आहे.आतापर्यंत केलेल्या उत्खननादरम्यान जे काही सोनेरी चमकदार दगड किंवा कोणतेही खनिज पदार्थ बाहेर येत आहेत ते एका खोक्यामध्ये ठेवून हिंदुस्थानी भूवैज्ञानिक ते प्रयोगशाळेत पाठवले आहेत. यामुळे हे सोनेरी दगड नेमके कसले आहेत, हे कळण्याकरिता मदत होईल.
गावातील स्थानिक नागरिकांचे याबाबत म्हणणे आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना या भागात सोनेरी आणि चमकदार दगड सापडले आहेत, जे त्यांना हिऱ्यासारखे दिसतात. खेरवार गावातील एका रहिवाशाने सांगितले की, आमच्या गावात जमिनीखाली हजारो टन सोने असू शकते. हे जर खरे झाले तर आमच्या गावचे नशीब बदलेल.
इंग्रजांच्या काळातही या गावात उत्खननाचे काम होत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, त्या काळात अत्याधुनिक यंत्रांच्या अभावामुळे इंग्रजांनी फारसे खोदकाम केले नाही, मात्र आता अत्याधुनिक मशिन्सही उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे या भागात पुन्हा एकदा उत्खननाचे काम सुरू करण्यात आले आहे, जेणेकरून हा परिसरात जमिनीखाली खरोखरोच हजारो टन सोन्याचा साठा आहे हे कळू शकेल