नवी दिल्ली- गुड्स एंड सर्विसेज (जीएसटी) टॅक्सवर आगामी काळात दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे. वस्तूंवरील कर कमी करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सरकारकडून याबाबत संकेत दिले जात आहे. वित्त राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी सांगितले आहे की जीएसटी काउंसिलमध्ये जीएसटीच्या दराबाबत विचार करत आहे. त्यानुसार वस्तू आणि सेवा यांच्या स्लॅबमध्ये बदल करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सद्य स्थिती ४ टॅक्स स्लॅब
जीएसटी अंतर्गत सद्य स्थितीत चार टॅक्स स्लॅब आहे. ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के असे टॅक्स स्लॅब आहे. वर्षी जानेवारीमध्ये झालेल्या जीएसटी काउंसिलच्या बैठकीत ५४ वा आणि २९ वस्तू वरील टॅक्स रेट कमी करण्यात आले होते. नोव्हेंबर २०१७ च्या बैठकीत १७८ वस्तूवरील टॅक्स स्लॅब काढून टाकण्यात आले होते.