शासन आपल्या दारी” या योजनेची अंमलबजावणी करण्याकामी उपविभागीय अधिकारी यांच्या दलनातजिल्ह्याधिकारी यांच्या उपस्थिती
भुसावळ प्रतिनिधी दि 1 “ शासन आपल्या दारी” या योजनेची अंमलबजावणी करण्याकामी उपविभागीय अधिकारी यांच्या दलनात (ता. ३०) रोजी दुपारी साडे बारा वाजेला मा. जिल्ह्याधिकारी यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या समस्थांचे निवेदने स्वीकारण्यात आली. त्यात महसूल विभाग व नगरपरीषद विभागा यांच्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात निवेदन देण्यात आले.
शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून शासनाच्या योजना या सर्वांपर्यंत पोहोचाव्या व विभागांची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना सूचना देऊन कमीत कमी वेळेत नागरिकांपर्यंत दाखले व योजना कशा पोहोचतील तसेच यासाठी नागरिकांना जिल्ह्याधिकारी कार्यालयापर्यंत येण्याची वेळ येऊ नये या संदर्भात चर्चा करण्यात आली.तसेच अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. आज सूचना दिलेल्या आहे यानंतर घेण्यात येणाऱ्या आढावा किंवा दौऱ्यात चुका झाल्यास त्यांच्या दंडात्मक कारवाई करण्यात येईल असाही इशारा जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितले.
जिल्हाधिकारी अमन मित्तल हे भुसावळ तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. सर्वप्रथम सर्व महसूल तलाठी, नगरपालिका, पंचायत समिती, पोलीस विभाग, महावितरण या सर्व विभागांची त्यांनी संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांना कामाबाबत सूचना केल्या. यावेळी त्यांनी सामान्य नागरिकांचे प्रश्न कमीत-कमी वेळेत कसे सुटणार, रेशनकार्ड, दाखले यासाठी येणाऱ्या अडचणी कमीत कमी वेळेत नागरिकांना मदत ते कसे पोहोचतील यावर काम करण्यास सांगितले.नागरिकांना जिल्हा अधिकारी कार्यालयात येण्याची वेळ येऊ नये असे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. अवैध विषयांच्या ठिका
विना नंबर वाहने चालवणे या सर्वांसाठी हेल्पलाइन सुरू केलेले
आजपर्यंत या हेल्पलाइनवर आलेल्या ८० टक्के माहिती ही खरी निघालेली आहे. तर २० टक्के माहिती ही खोटी निघाली आहे. या हेल्पलाइन क्रमांकांवर (9202284010) वर जनतेचे संपर्क साधून आपल्या परिसरातील तसेच शासकीय अधिकाऱ्यांकडून अडचणी येत असेल तर अशा तक्रारी आल्या तरी आपण कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सांगितले